महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मोठी बातमी, नदालची विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमधून माघार

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने विम्बल्डन आणि ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राफेल नदाल
मोठी बातमी, राफेल नदालची विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमधून माघार

By

Published : Jun 17, 2021, 6:26 PM IST

Updated : Jun 17, 2021, 6:40 PM IST

मुंबई - स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. शारिरिक थकवा जाणवत असल्याने त्याने या स्पर्धांमधून माघार घेत असल्याचे सांगितलं आहे. या संदर्भात नदालने ट्विट केलं आहे.

नदालने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'मी या वर्षीच्या विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपा नव्हता. पण शारिरिक थकवा पाहता आणि पुढील करियर पाहता हा निर्णय घेणे आवश्यक होता.'

दरम्यान, विम्बल्डन स्पर्धा सुरु होण्याच्या ११ दिवसांपूर्वी नदालने हा निर्णय घेतला आहे. तर टोकियो ऑलिम्पिक २३ जुलैपासून सुरु होणार आहे.

फ्रेंच ओपनमध्ये नदालचा पराभव -

नुकतीच पार पडलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत नदालला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला. उपांत्य फेरीत त्याची गाठ जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सार्बियाचा खेळाडू नोवाक जोकोव्हिचशी झाली. या सामन्यात जोकोव्हिचने नदालचा ३-६, ६-३, ७-६, ६-२ असा पराभव केला.

हेही वाचा -ग्रेट कमबॅक! सचिन, लक्ष्मणने केलं जोकोव्हिचचं कौतूक

हेही वाचा -विम्बल्डन फायनलसाठी १०० टक्के प्रेक्षकांना परवानगी

Last Updated : Jun 17, 2021, 6:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details