पॅरिस -क्ले कोर्टचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला नदालने तिसऱ्या फेरीत बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनचा 6-1, 6-3, 6-4, 6-3 ने पराभव केला.
फ्रेंच ओपन : गोफिनला पराभूत करत नदाल चौथ्या फेरीत - Tennis tournament
2 तास आणि 49 मिनिटे चाललेला हा सामना नदालने 4 सेटमध्ये आपल्या नावावर केला

Rafael Nadal
2 तास आणि 49 मिनिटे चाललेला हा सामना नदालने 4 सेटमध्ये आपल्या नावावर केला. फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत नदालचा सामना अर्जेटीनाच्या जुआन इग्नाशियो लोंदेरोशी होणार आहे.
17 ग्रँडस्लॅम विजेता असेलेल्या नदालसोबत स्वीत्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर आणि जपानच्या केई निशिकोरी यांनीही फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे.