मेलबर्न - स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये विजयी शुभारंभ केला. जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी असलेल्या नदालने पहिल्या फेरीत बोलिवियाच्या हुगो डेलियनला मात देत दुसरी फेरी गाठली.
हेही वाचा -IND VS NZ : टीम इंडिया 'मिशन न्यूझीलंड'साठी रवाना
नदालने डेलियनला ६-२, ६-३, ६-० असे सहज हरवले. नदालने आजतागायत फक्त एकदा ऑस्ट्रेलिया ओपनचे जेतेपद पटकावले आहे. यंदाच्या स्पर्धेचे नदालने विजतेपद मिळवले तर त्याचे हे २० वे ग्रँडस्लॅम ठरेल.
दुसरीकडे, पुरुषांच्या इतर एकेरी सामन्यांमध्ये स्वित्झर्लंडचा स्टॅन वॉवरिंका, रशियाचा कॅरेन खाचानोव्ह, ऑस्ट्रियाचा डोमिनिक थीम आणि क्रोएशियाचा मारिन चिलीच यांनी बाजी मारली. वॉवरिंकाने बोस्नियाच्या दामीर जुम्हूरचा ७-५, ६-७(४) ६-४, ६-४ असा पराभव केला. खाचानोव्हने स्पेनच्या मारिओ विलेला मार्टिनेझचा ४-६, ६-४, ७-६ (४) ६-३ असा पराभव केला. तर, थाईमने फ्रान्सच्या अॅड्रियन मॅनारिनोचा ६-३, ७-५, ६-२ असा पराभव केला. त्याच वेळी, चिलीचने फ्रान्सच्या कोरेन्टीन मौतेचा ६-३, ६-२, ६-४ असा पराभव केला आहे.