पॅरिस - क्ले कोर्टचा बादशाह म्हणून ओळख असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत धडक दिली आहे. तर, स्वित्झर्लंडचा आघाडीचा टेनिसपटू स्टॅन वावरिंका स्पर्धेतून बाहेर पडला आहे. २०१५मध्ये वावरिंकाने या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते.
फ्रेंच ओपन : राफेल नदालची आगेकूच, वावरिंका बाहेर - राफेल नदाल लेटेस्ट न्यूज
स्पेनच्या राफेल नदालने फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत धडक दिली आहे. नदालने इटलीच्या स्टेफानो ट्रावागिलाला ६-१, ६-४, ६-० असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
शुक्रवारी फिलिपे चार्टर कोर्टात खेळल्या गेलेल्या सामन्यात नदालने इटलीच्या स्टेफानो ट्रावागिलाला ६-१, ६-४, ६-० असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. हा सामना एक तास ३५ मिनिटे चालला. सामन्यानंतर नदाल म्हणाला, "टेनिसशिवाय बरेच महिने घालवल्यानंतर आपण एका विचित्र परिस्थितीत आहोत, विशेषत: माझ्यासाठी कारण मी यूएस ओपनमध्ये खेळलेलो नाही. स्टेफानोसारख्या खेळाडूसमोर मी चांगल्या पद्धतीने खेळलो."
पुढच्या फेरीत नदालचा सामना अमेरिकेच्या सेबॅस्टियन कोर्डाशी होईल. पुरुषांच्या एकेरी गटातील दुसर्या सामन्यात वावरिंकाला ह्युगो गॅस्टनने २-६, ६-३, ६-३, ४-६, ६-० असे पराभूत केले.