मोनॅको -स्पेनचा दिग्गज खेळाडू राफेल नदालने मॉन्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानी असलेल्या नदालने आपल्या कारकिर्दीत ही स्पर्धा 11 वेळा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
राफेल नदालचा 'मॉन्टे कार्लो मास्टर्स' स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश - Monte-Carlo Masters
मॉन्टे कार्लो मास्टर्स ही स्पर्धा नदालने 11 वेळा जिंकली आहे
राफेल नदाल
नदालने पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत 35 व्या स्थानी असलेल्या अर्जेंटिनाच्या गुइडो पेलालाचा 7-6(1), 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
पहिल्या सेटमध्ये उभय खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला, मात्र शेवटी नदालने 7-6(1) अशी बाजी मारत आघाडी घेतली. तर दुसऱ्या सेटमध्ये, नदालने आपल्या प्रतिस्पर्ध्याला सामन्यात परतण्याची संधी न देता 6-3 ने जिंकत अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे.