रोम -स्पेनचा महान खेळाडू राफेल नदालने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानी असलेल्या नदालने ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासचा ६-३, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली.
स्टेफानोसचा पराभव करत राफेल नदाल इटालियन ओपनच्या अंतिम फेरीत दाखल - final
अंतिम फेरीत राफेल नदालचा सामना दिएगो श्वार्ट्झमनविरुद्ध आणि नोव्हाक जोकोव्हिच यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
![स्टेफानोसचा पराभव करत राफेल नदाल इटालियन ओपनच्या अंतिम फेरीत दाखल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3321126-963-3321126-1558202812061.jpg)
अंतिम फेरीत राफेल नदालचा सामना अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनविरुद्ध आणि जागतिक नंबर १ टेनिस खेळाडू असलेला सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिच यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. या स्पर्धेतील महिला एकेरीचा अंतिम सामना ब्रिटनच्या जोहाना कोन्टा आणि चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिसकोव्हा यांच्यात रंगणार आहे.
इटालियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत नदालने आपलाच देशवासी फर्नांडो व्हेर्डास्कोला ६-४, ६-० ने पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. तर फेडररने माघार घेतल्यामुळे त्सित्सिपासला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला होता.