अबू धाबी - ग्रीसच्या स्टीफन सितसिपासचा पराभव करत स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने मुबादला विश्व टेनिस चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात नदालने पहिला सेट गमावल्यानंतर पुढील दोन सेटमध्ये पुनरागमन केले.
नदालने पटकावले मुबादला विश्व टेनिस चॅम्पियनशिपचे विजेतेपद - राफेल नदाल लेटेस्ट न्यूज
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, नदालने अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत 6 व्या क्रमांकावर असलेल्या सितसिपासचा 6-7, 7-5, 7-6 असा पराभव करत विजेतेपद जिंकले.
नदालने पटकावले मुबादला विश्व टेनिस चॅम्पियनशिपचे विजेतेपद
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, नदालने अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत 6 व्या क्रमांकावर असलेल्या सितसिपासचा 6-7, 7-5, 7-6 असा पराभव करत विजेतेपद जिंकले. 19 वेळा ग्रँड स्लॅम जिंकणार्या नदालचे हे पाचवे अबू धाबी जेतेपद आहे. गेल्या महिन्यात एटीपी फायनल्समध्ये नदालनेही सितसिपासचा 6-7, 6-4, 7-5 असा पराभव केला होता.
नदाल आणि सितसिपास आता पुढच्या वर्षी पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार आहेत.