पॅरिस - स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचला नमवत फ्रेंच ओपनचे १३वे विजेतेपद पटकावले. २ तास ४० मिनिटे रंगलेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नदालने जोकोविचचा ६-०, ६-२, ७-५ असा पराभव केला. या विजयासह नदालने कारकिर्दीचे २०वे ग्रँडस्लॅम विजेतेपदही आपल्या नावावर केले.
जोकोविचला नमवत नदाल ठरला फ्रेंच ओपनचा राजा - nadal wins french open 2020
नदालने नोव्हाक जोकोविचला नमवत फ्रेंच ओपनचे १३वे विजेतेपद पटकावले. या विक्रमी जेतेपदासह नदालने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररची बरोबरी केली आहे. फेडररनेही २० ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत.
या विक्रमी जेतेपदासह नदालने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररची बरोबरी केली आहे. फेडररनेही २० ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. यावर्षी जोकोविचला पहिला पराभव मिळाला असून त्याने आतापर्यंत १७ ग्रँडस्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत. जोकोविचने उपांत्य फेरीत ग्रीसच्या स्टेफानोस त्सिसिपासविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. तर, दुसरीकडे नदालने एकही सेट न गमावता अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्त्झमनचा तीन सेटमध्ये धुव्वा उडवत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.
या सामन्यापूर्वी, नदाल-जोकोविच हे आतापर्यंत ५६ सामन्यांत एकमेकांसमोर आले होते. यात २९ सामने जोकोविचने जिंकले तर, नदालने १७ सामन्यांत बाजी मारली आहे. फ्रेंच ओपनचा रेकॉर्ड पाहिल्यास दोघांमध्ये सात सामने झाले होते. यात सहावेळा नदालने बाजी मारली होती.