महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

इटालियन ओपन : थीम आणि मारिनचे आव्हान संपुष्टात तर फेडरर, नदालचा तिसऱ्या फेरीत प्रवेश - Italian Open

20 ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररने दुसऱ्या फेरीत स्पेनच्या जोआओला सहज धूळ चारत आरामात तिसरी फेरी गाठली

फेडरर, नदाल

By

Published : May 16, 2019, 8:58 PM IST

रोम - जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीम आणि दहाव्या स्थानी असलेल्या क्रोएशियाच्या मारिन सिलिकला गुरुवारी इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवामुळे दोन्ही खेळाडूंचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. दुसरीकडे २ दिग्गज खेळा़डू रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनी दुसऱ्या फेरीत विजय मिळवत पुढील फेरी गाठली आहे.

दुसऱ्या फेरीत जर्मनीच्या लेनार्ड स्ट्रफने सिलिचला 6-2, 6-3 असा पराभव केला तर स्पेनच्या फर्नाडो वर्डास्कोने डोमिनिकला 4-6, 6-4, 7-5 अशी मात देत बाहेरचा रस्ता दाखवला.

जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या स्थानी असलेला 20 ग्रँडस्लॅम विजेत्या रॉजर फेडररने दुसऱ्या फेरीत स्पेनच्या जोआओ साउसाला 6-4, 6-3 अशी सहज धूळ चारत आरामात तिसरी फेरी गाठली. तर वर्ल्ड नंबर-2 राफेल नादालने फ्रांसच्या जैरेमी चार्डीला एकतर्फी झालेल्या सामन्यात 6-0, 6-1 ने पराभव केला.

ABOUT THE AUTHOR

...view details