महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

लग्नाच्या बंधनात अडकणार टेनिसचा बादशाहा, नदालसाठी सोडली होती 'तिने' नोकरी.. - राफेल नदालचे लग्न

नदालच्या लग्नाला जवळपास साडेतीनशे पाहुणे उपस्थित राहणार आहेत. सुमारे चाळीस वर्ष स्पेनचा राजा असलेले जुआन कार्लोस प्रथम यांनाही नदालच्या लग्नाचे निमंत्रण मिळाले आहे. तर, टेनिसमधून निवृत्त्त झालेले कार्लोस मोया यांचीही नदाल आणि झिस्का यांच्या लग्नाला उपस्थिती असणार आहेत.

लग्नाच्या बंधनात अडकणार टेनिसचा बादशाहा, नदालसाठी सोडली 'तिने' होती नोकरी..

By

Published : Oct 18, 2019, 7:04 PM IST

नवी दिल्ली -स्पेनचा दिग्गज टेनिसपटू आणि क्ले कोर्टचा बादशाहा म्हणून ओळख असलेला राफेल नदाल शनिवारी विवाह बंधनात अडकणार आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार नदालची बालपणीची मैत्रीण झिस्का प्रेलोसोबत नदाल विवाह करणार आहे.

नदाल आणि झिस्का

हेही वाचा -'धोनी नही तो फॅन्स नही', रांचीतील कसोटीसाठी प्रेक्षकसंख्या घटली

नदालच्या लग्नाला जवळपास साडेतीनशे पाहुणे उपस्थित राहणार आहेत. सुमारे चाळीस वर्ष स्पेनचा राजा असलेले जुआन कार्लोस प्रथम यांनाही नदालच्या लग्नाचे निमंत्रण मिळाले आहे. तर, टेनिसमधून निवृत्त्त झालेले कार्लोस मोया यांचीही नदाल आणि झिस्का यांच्या लग्नाला उपस्थिती असणार आहेत.

नदाल आणि झिस्का

नदाल आणि झिस्का १४ वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. झिस्काचे खरे नाव मारिया फ्रांसिस्का पेरेलो असे आहे. झिस्काने आपली नोकरी सोडली आणि राफेल नदाल संस्थेच्या प्रकल्प संचालक म्हणून काम करण्यास सुरवात केली. नदालने हा चॅरिटेबल ट्रस्ट १० वर्षांपूर्वी सुरू केला होता.

नदाल आणि झिस्का

ABOUT THE AUTHOR

...view details