पॅरिस -गतविजेता आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदालने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीतच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. राफेलने पहिल्या फेरीत जर्मनीच्या यानिक हॅन्फमनला 6-2, 6-1, 6-3 असे पराभूत केले. नदालसोबत स्वीत्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडररनेही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
फ्रेंच ओपन : नदाल आणि बर्टेन्सचा दुसऱ्या फेरीत प्रवेश - french open
17 ग्रँडस्लॅम विजेता असेलेल्या असलेल्या राफेल नदालचा दुसऱ्या फेरीतील सामना हा जर्मनच्या यानिक माडेनशी होणार आहे
17 ग्रँडस्लॅम विजेता असेलेल्या असलेल्या राफेल नदालचा दुसऱ्या फेरीतील सामना हा जर्मनच्या यानिक माडेनशी होणार आहे. दुसरीकडे महिला एकेरीत नेदरलँड्सच्या किकी बेर्टेन्सने फ्रांसच्या पाउलिने परमेंटियरला 6-3, 6-4 ने मात देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळालेत. माजी अग्रमानांकित महिला टेनिस स्टार कॅरोलिन वोझ्नियाकी, व्हीनस विल्यम्स आणि एंजलिक कर्बर यांना पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागल्याने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.