मॉन्ट्रियल -स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेन नदालने पुरुषांमध्ये तर कॅनडाच्या बियान्का अँड्रेस्कूने महिलांमध्ये रॉजर्स चषकाचे विजेतेपद पटाकवले आहे. पुरुषांच्या एकेरीत नदालने रुसच्या डॅनियल मेदवेदेवला हरवले. नदालने त्याचा ६-३, ६-० असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
टेनिस : राफेल नदाल आणि बियान्का अँड्रेस्कूची रॉजर्स चषकाला गवसणी -

2005 🏆
2008 🏆
2013 🏆
2018 🏆
2019 🏆@RafaelNadal retains his #CoupeRogers crown! 👑

And successfully defends a hardcourt title for the first time in his career 👏 pic.twitter.com/2RqgnsOJi9
— Tennis TV (@TennisTV) August 11, 2019

नदालने एकूण पाचवेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

महिलांच्या एकेरीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे अँड्रेस्कूला हा किताब जिंकता आला. दुखापत होण्यापूर्वी सेरेनाने सामन्यात ३-१ ने आघाडी घेतली होती.
एकतर्फी झालेला हा पुरुषांचा अंतिम सामना केवळ ७० मिनिटे चालला. नदालने एकूण पाचवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. सामना जिंकल्यावर नदाल म्हणाला, 'मला अजून शिकायचे आहे. पुढच्या वर्षी वेगवेगळे सामने खेळण्यासाठी मी नवीन गोष्टी घेऊन येईन. मेदवेदेव हा प्रतिभावंत खेळाडू आहे. पण, काही दिवस इतर दिवसांपेक्षा चांगले असतात.'