महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ओसाका, अझारेंका यांनी ऑस्ट्रेलिया ओपनच्या तयारीसाठी घेतली स्पर्धेतून माघार - osaka naomi NEWS

जपानची नाओमी ओसाका आणि बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका या दोघींनी ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या तयारीसाठी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

osaka-azrenka-pulls-out-of-australian-open-preparation
ओसाका, अझारेंका यांनी ऑस्ट्रेलिया ओपनच्या तयारीसाठी घेतली स्पर्धेतून माघार

By

Published : Feb 6, 2021, 3:40 PM IST

मेलबर्न - जपानची नाओमी ओसाका आणि बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका या दोघींनी ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या तयारीसाठी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ओसाकाला गिप्सलँड स्पर्धेत किरकोळ दुखापत झाली. त्याचा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत एलिसे मर्टेंस हिच्याशी सामना होणार होता. तेव्हा तिने अचानक माघार घेण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे अझारेंका हिने कमरेच्या त्रासामुळे ग्राम्पियंस ट्रॉफीतून माघार घेतली. तिची स्पर्धेत उपउपांत्य फेरीत एनेट कोंटावेट हिच्याशी लढत होणार होती.

दरम्यान, ओसाका आणि अझारेंका यांच्याआधी सेरेना विल्यम्स हिने माघार घेतली आहे. तिचा वॅली क्लासिक स्पर्धेत अॅश्ले बार्टी हिच्याशी सामना होणार होता. तेव्हा तिने माघार घेतली.

हेही वाचा -ऑस्ट्रेलिया ओपन प्रदर्शनीय सामने : नदाल, सेरेना आणि हॅलेप विजयी

हेही वाचा -ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये प्रत्येक दिवशी असणार ३० हजार प्रेक्षक!

ABOUT THE AUTHOR

...view details