पॅरिस -फ्रेंच ओपन पात्रता फेरीपूर्वी एक महिला टेनिसपटू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळली आहे. या चाचणीनंतर तिला स्पर्धेतून वगळण्यात आले. फ्रेंच टेनिस महासंघाने या महिला खेळाडूचे नाव नमूद केलेले नाही.
फ्रेंच ओपन पात्रता फेरीपूर्वी महिला टेनिसपटूला कोरोनाची लागण
ही टेनिसपटू सात दिवस क्वारंटाइन असेल, असे फ्रेंच टेनिस महासंघाने सांगितले आहे. महिलांची पात्रता स्पर्धा मंगळवारपासून सुरू होईल. अन्य पाच खेळाडूंना पात्रतेतून वगळण्यात आले आहे.
ही टेनिसपटू सात दिवस क्वारंटाइन असेल, असे फ्रेंच टेनिस महासंघाने सांगितले आहे. महिलांची पात्रता स्पर्धा मंगळवारपासून सुरू होईल. अन्य पाच खेळाडूंना पात्रतेतून वगळण्यात आले, त्यापैकी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर, तीन जण कोरोनाची लागण झालेल्या प्रशिक्षकाच्या संपर्कात होते, असे फेडरेशनने सांगितले आहे.
मे महिन्यात खेळवण्यात येणारी फ्रेंच ओपन स्पर्धा यावर्षी कोरोनामुळे सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. अलीकडे, यूएस ओपन स्पर्धाही आयोजित केली गेली होती. त्यानंतर इटालियन ओपन स्पर्धा पार पडली. जोकोविचने इटालियन ओपनच्या पुरुष एकेरीचे तर सिमोना हालेपने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.