महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फ्रेंच ओपन : नोव्हाक जोकिविच दुसऱ्या फेरीत - जोकोविच लेटेस्ट न्यूज

सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने फ्रेंच ओपनमध्ये आपला पहिला सामना जिंकला आहे. "जेतेपदासाठी संघर्ष करणे हे माझे ध्येय आहे", असे जोकोविचने पहिल्या फेरीतील विजयानंतर सांगितले.

Novak djokovic won his first french open 2020 match
फ्रेंच ओपन : नोव्हाक जोकिवच दुसऱ्या फेरीत

By

Published : Sep 30, 2020, 3:07 PM IST

पॅरिस -जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने फ्रेंच ओपनमध्ये आपला पहिला सामना जिंकला आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत जोकोविचने स्वीडनच्या मिखाईल याम्मरचा पराभव केला. त्याने याम्मरला ६-०, ६-२, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

"जेतेपदासाठी संघर्ष करणे हे माझे ध्येय आहे", असे जोकोविचने पहिल्या फेरीतील विजयानंतर सांगितले. जोकोविच या स्पर्धेत आपल्या १८व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे स्वप्न घेऊन मैदानात उतरला आहे. दुसर्‍या फेरीत जोकोविचचा सामना रिकार्डस बेरानकिसशी होईल. बेरानकिसने बोलिव्हियाच्या ह्युगो डॅलिएनचा ६-१, ६-४, ६-४ असा पराभव केला.

इटलीच्या मॅटिओ बेरेटिनीने कॅनडाच्या वासेक पोसपिसिलचा ६-३, ६-१, ६-३ असा असा पराभव करून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. फ्रेंच ओपन ही स्पर्धा ११ ऑक्टोबरपर्यंत रंगणार आहे. या स्पर्धेची सुरूवात १९८१मध्ये फ्रेंच क्ले कोर्ट चॅम्पियनशीप या नावाने करण्यात आली होती. लाल मातीवरील 'बादशाह' अशी ओळख असलेल्या स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने तब्बल १२ वेळ ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत नदालला अग्रमानांकित सर्बियाचा खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचचे मोठे आव्हान असणार आहे. याशिवाय या दोघांना गेल्या दोन फ्रेंच स्पर्धामध्ये उपविजेतेपद मिळवणारा ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिमचे कडवे आव्हान आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details