न्यूयॉर्क- सर्बियाच्या स्टार खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पाच सेटमध्ये रंगलेल्या सामन्यात जोकोव्हिचने 6-4, 4-6, 2-6, 6-3, 6-4 अशी मारली. अंतिम सामन्यात जोकोव्हिचने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमचा धुव्वा उडवत विजेतेपदावर नाव कोरले. दरम्यान, जोकोव्हिचचे ऑस्ट्रेलियन ओपनचे हे आठवे विजेतेपद ठरले.
अंतिम सामना रंगतदार ठरला. पहिला सेट जोकोव्हिचने ६-४ असा आरामात जिंकला. तेव्हा थिएमने दुसरा आणि तिसरा सेट जिंकत सामन्यात रंगत आणली. त्याने दुसरा सेट ६-४ तर तिसरा सेट ६-२ ने जिंकला.
चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिचने शानदार पुनरागमन केले. त्याने हा सेट ६-३ असा जिंकत सामना निर्णायक सेटमध्ये पोहोचवला. निर्णायक सेट रंगतदार होईल, असे वाटत असताना जोकोव्हिचने आपला अनुभव पणाला लावत पाचव्या सेटमध्ये ६-३ अशी बाजी मारली आणि या सेटसह त्याने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.