नवी दिल्ली -सर्बियाचा अनुभवी टेनिसपटू नोव्हाक जोकोविच या वर्षाचा शेवट एटीपी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर राहून करणार आहे. यासह तो दिग्गज माजी टेनिसपटू पीट सँप्रसच्याच्या सहा वेळा अव्वल स्थानावर राहण्याच्या विक्रमाशी बरोबरी करेल. सध्या जोकोविच क्रमवारीत पहिल्या स्थानी असून वर्षाच्या अखेरीपर्यंत क्रमवारीत कोणतेही बदल झालेले नाहीत.
वर्षाच्या अखेरीस जोकोविच करणार खास विक्रम - djokovic and nadal news
जोकोविच दिग्गज माजी टेनिसपटू पीट सँप्रसच्याच्या सहा वेळा अव्वल स्थानावर राहण्याच्या विक्रमाशी बरोबरी करेल. सध्या जोकोविच क्रमवारीत पहिल्या स्थानी असून वर्षाच्या अखेरीपर्यंत क्रमवारीत कोणतेही बदल झालेले नाहीत.
![वर्षाच्या अखेरीस जोकोविच करणार खास विक्रम novak djokovic will end the year by staying in the top for the third consecutive year](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9704931-thumbnail-3x2-dfdfdf.jpg)
एटीपीच्या संकेतस्थळानुसार, स्पेनचा राफेल नदालही वर्षाचा शेवट दुसर्या स्थानावर राहून करेल. जोकोविच आणि नदाल सलग तिसऱ्यांदा आणि एकून पाचव्यांदा आपली ही क्रमवारी राखणार आहेत. जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर यांच्यासह नदाल तब्बल १२वेळा दुसऱ्या क्रमांकावर राहण्याच्या विक्रमाची बरोबरी करेल. सध्या जागतिक क्रमवारीत फेडरर पाचव्या स्थानी आहे.
फ्रेंच ओपनमध्ये नदालची जोकोविचवर सरशी -
लाल मातीच्या कोर्टवरील आपली एकाधिकारशाही स्पेनच्या राफेल नदालने फ्रेच ओपनमध्ये पुन्हा दाखवून दिली. त्याने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला तीन सेटमध्ये पराभूत करत यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. नदालचे हे ऐतिहासिक १३वे फ्रेंच ओपन विजेतेपद ठरले. या विजेतेपदासह नदालने रॉजर फेडररच्या पुरुष एकेरीतील विक्रमी २० ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरीसुद्धा साधली.