पॅरिस -जगातील प्रथम क्रमांकाचा पुरुष टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने फ्रेंच ओपनच्या एकेरी प्रकारात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. चौथ्या फेरीच्या सामन्यात जोकोविचने रशियाच्या कारेन खाचनोवचा पराभव केला.
फ्रेंच ओपन : जोकोविचची उपांत्यपूर्व फेरीत धडक - french open quarter-finals
चौथ्या फेरीच्या सामन्यात जोकोविचने रशियाच्या कारेन खाचनोवचा पराभव केला. जोकोविचचा पुढील सामना स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाशी होईल.
दोन तास २३ मिनिटे चाललेल्या या सामन्यात जोकोविचने १५व्या मानांकित खाचनोवला ६-४, ६-३, ६-३ असे पराभूत केले. जोकोविचचा पुढील सामना स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाशी होईल. बुस्टाने जर्मनीच्या डॅनियल आल्टमेयरवर ६-२, ७-५, ६-२ असा विजय मिळवला आहे.
जोकोविच या हंगामात अजेय आहे. यावर्षी खेळलेल्या कोणत्याही सामन्यात तो हरलेला नाही. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनच्या राफेल नदालचा सामना इटलीच्या जेनिक सिनरशी होईल. तर ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमचा सामना १२व्या मानांकित दिएगो श्वार्ट्झमनशी होईल. नदालने पुरुष एकेरीच्या तिसर्या फेरीत अमेरिकेच्या सेबस्टियन कोर्डाला सरळ सेटमध्ये पराभूत करून अंतिम-८मध्ये प्रवेश केला.