व्हिएन्ना - जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला व्हिएन्ना ओपन स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या जागतिक नामांकित ४२ क्रमांकावर असलेल्या लोरेन्झो सॉन्गोने जोकोविचचा २-६,१-६ असा पराभव केला.
जागतिक नामांकित पहिल्या दहा खेळाडूंना पराभूत करण्याची लोरेन्झो सॉन्गो पहिलीच वेळ आहे. दरम्यान, या पराभवाने जोकोविचचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्याचा हा वर्षातील तिसरा पराभव ठरला.