पॅरिस -जगातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविच फ्रेंच ओपनच्या तिसर्या फेरीत पोहोचला आहे. सर्बियाच्या या खेळाडूने सरळ सेटमध्ये लिथुआनियाच्या रिकॅड्रेस बेरेनकीसचा पराभव केला. गुरुवारी झालेल्या या सामन्यात जोकोविचने बेरेनकीसचा ६-१, ६-२, ६-२ असा पराभव केला. हा सामना एक तास २३ मिनिटे चालला.
रोलंड गॅरोसमध्ये जोकोविचचा हा ७०वा विजय आहे. जोकोविचने क्ले कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सर्वाधिक विजयात स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररची बरोबरी केली आहे. या दोघांच्या पुढे राफेल नदाल (९५) आहे.