मोनॅको -सर्बियन टेनिसस्टार आणि जागतिक क्रमवारीत पहिल्यास्थानी असलेला नोव्हाक जोकोविचला मॉन्टे कार्लो मास्टर्सच्या तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवासह जोकोविचचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे. नोव्हाकने 2013 आणि 2015 मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
'मॉन्टे कार्लो मास्टर्स' स्पर्धेत जोकोविचचा धक्कादायक पराभव, स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात - ATP
मागच्या महिन्यात झालेल्या मियामी ओपन आणि इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेतही जोकोविचला पराभवाचा धक्का बसला होता

गुरुवारी खेळलेल्या पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात नोव्हाकला रशियाच्या डेनिल मेदवेदेव्हने 6-3, 4-6, 6-2 असे पराभूत करत सनसनाटी विजय मिळवला. या विजयासह त्याने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मागच्या महिन्यात झालेल्या मियामी ओपन आणि इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेतही जोकोविचला पराभवाचा धक्का बसला होता.
जोकोविचने या सामन्यात पहिला सेट 6-3 ने गमावल्यानंतर दुसऱ्या सेट 4-6 आपल्या नावावर करत जोरदार पुनरागमन केले. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये डेनिलने आपला खेळ उंचावत सेट 6-2 ने जिंकत सामना जिंकला.