महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Unstoppable! जोकोविच दुबई ओपनचा पाचव्यांदा विजेता - नोवाक जोकोविच लेटेस्ट न्यूज

जोकोविचने ग्रीकच्या सितसिपासचा ६-३, ६-४ असा पराभव केला. जोकोविचच्या कारकीर्दीचे हे ७९ वे विजेतेपद आहे.

Novak Djokovic has triumphed 5 times dubai open
Unstoppable!..जोकोविच दुबई ओपनचा पाचव्यांदा विजेता

By

Published : Mar 1, 2020, 1:28 PM IST

नवी दिल्ली - जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आणि अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचने शनिवारी दुबई ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात त्याने स्टेफानोस सितसिपासला मात दिली. जोकोविचचे दुबई ओपनचे हे पाचवे विजेतेपद आहे.

हेही वाचा -VIDEO : What a catch! ...जडेजाच्या झेलमुळे क्रीडाविश्व अचंबित

जोकोविचने ग्रीकच्या सितसिपासचा ६-३, ६-४ असा पराभव केला. जोकोविचच्या कारकीर्दीचे हे ७९ वे विजेतेपद आहे. उपांत्य फेरीत त्याने फ्रान्सच्या गेल मोनफिल्सला नमवले होते. तर, उपांत्यपूर्व फेरीत त्याने कारेन काचनोवला सरळ सेटमध्ये मात दिली होती.

भारतीय चाहत्यांसमोर खेळण्यास जोकोविच उत्सुक -

टेनिस विश्वातील महान खेळाडू जोकोविचने भारतात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने भारतीय चाहत्यांशी संपर्क साधण्याची इच्छाही व्यक्त केली. भारतीय चाहत्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल जोकोविचने आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details