नवी दिल्ली - जागतिक टेनिस क्रमवारीतील पहिल्या स्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने मॉन्टे कार्लो मास्टर्स स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे. जोकोविचने स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत जर्मनीच्या फिलिप कोलश्राइबर 6-3, 4-6, 6-4 असे पराभूत केले.
नोव्हाक जोकोविच 'मॉन्टे कार्लो मास्टर्स' स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत दाखल - Kohlschreiber
जर्मनीच्या फिलिप कोलश्राइबर नोव्हाकने मिळवला विजय
नोव्हाक जोकोविच
वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचला या स्पर्धेतील पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. पुढच्या फेरीत जोकोविचचा सामना अमेरीकेच्या टेलर फ्रिट्झशी होणार आहे.
यापूर्वी झालेल्या मियामी ओपनमध्ये नोव्हाकसोबत मोठा उलटफेर झाला होता. स्पेनच्या रॉबेर्टो अगुटने 1-6, 7-5, 6-3 असे पराभूत करत नोव्हाकचे मियामी ओपनमधील आव्हान संपुष्टात आणले होते.