नवी दिल्ली -ऑस्ट्रेलियाचा स्टार टेनिसपटू निक किर्गीयोसला एका मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. सिनसिनाटी मास्टर्सच्या खुल्या टेनिस स्पर्धेत किर्गीयोसने रॅकेट तोडले होते. त्यामुळे किर्गीयोसवर ११३,००० डॉलर्सच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
विनाअनुमती मैदान सोडणे, खेळभावनेच्या उलट वागणे या गोष्टींबद्दल किर्गीयोसला हा दंड लागला आहे. शिवाय, या घटनेची पूर्ण चौकशी झाल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाईदेखील होऊ शकते.