नवी दिल्ली - जपानची आघाडीची महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाने आपला टेनिस प्रशिक्षक बदलला आहे. प्रशिक्षक जेरेमाईन जेनकिन्स यांची ओसाकाने साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून तिने वर्षात दोनवेळा आपला प्रशिक्षक बदलला आहे.
हेही वाचा -विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी द्युतीला मिळाले संघात स्थान
ओसाकाची कामगिरी सध्या चांगली होत नसून क्रमवारीतही तिची घसरण झाली आहे. पॅसिफिक ओपन स्पर्धेआधी तिने हा निर्णय जाहीर केला. जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावल्यानंतर ओसाकाने जेनकिन्सला आपला प्रशिक्षक म्हणून निवडले होते.
ओसाका आपल्या ट्विटमध्ये म्हणाली, 'एकत्र वेळ घालवल्याबद्दल मी खुप आभारी आहे. टेनिस कोर्टवर मी खुप काही शिकले. पण, आता मला वाटते की बदल केला पाहिजे.' २१ वर्षीय ओसाका जेनकिन्स यांच्या प्रशिक्षकपदाच्या काळात कोणतीही स्पर्धा जिंकलेली नाही.
३४ वर्षीय जेनकिन्स हे अमेरिका टेनिस संघाच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. शिवाय, ते दिग्गज महिला खेळाडू व्हिनस विल्यम्स हिच्यासोबत सामने खेळले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या अमेरिका ओपन स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेंकिककडून ओसाकाला पराभव स्वीकारावा लागला होता.