रोम - जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली जपानची महिला टेनिस खेळाडू नाओमी ओसाकाने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. हाताला झालेल्या दुखापतीमुळे महिला एकेरीच्या क्वार्टर फायनल सामन्यापूर्वी ओसाकाने स्पर्धेतून माघार घेतली आहे.
इटालियन ओपन : अव्वल स्थानी असलेल्या नाओमी ओसाकाची क्वार्टर फायनल सामन्यापूर्वी माघार
इटालियन ओपन स्पर्धेत ओसाकाकडे संभाव्य विजेती म्हणून पाहिले जात होते. मात्र, दुखापतीमुळे ओसाकाला स्पर्धेतूबाहेर पडावे लागले
ओसाकाचा क्वार्टर फायनलमध्ये सामना माद्रिद ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या नेदरलँड्सच्या किकी बेर्टेन्सशी होणार होता. मात्र, या सामन्यापूर्वी दुखापत झाल्याने नाओमीना स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. त्यामुळे बेर्टेन्स क्वार्टर फायनल न खेळताच महिला एकेरीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. सेमीफायनलमध्ये किकीचा सामना ब्रिटनच्या जोहाना कोन्टाशी होणार आहे.
या स्पर्धेत ओसाकाकडे संभाव्य विजेती म्हणून पाहिले जात होते. मात्र, दुखापतीमुळे ओसाकाला स्पर्धेतूबाहेर जावे लागले. ओसाकाने आजवर अमेरिकन ओपन व ऑस्ट्रेलियन ओपन या २ ग्रँडस्लॅम स्पर्धा आपल्या नावावर केल्या आहेत. याच स्पर्धेत पुरुष एकेरीत दिग्गज खेळाडू रॉजर फेडररलाही पायाला झालेल्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे.