नवी दिल्ली -यूएस ओपन स्पर्धेतील पराभव विसरुन जपानच्या नाओमी ओसाकाने दणक्यात पुनरागमन केले आहे. ओसाकाने बेल्जियमच्या एलिसी मर्टन्सला ६-४, ६-१ असे हरवत पॅन पॅसिफिक जपान खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक दिली.
हेही वाचा -बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी दादाच राहणार
ओसाकाने या सामन्यात मर्टन्सला खेळ उंचावण्याची संधीच दिली नाही. तिने दोन्ही सेटमध्ये सर्व्हिसब्रेकचे गुण मिळवले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओसाकाची गाठ रशियाच्या ऍनास्ताशिया पॅव्हलिउचेन्कोवा हिच्याशी पडणार आहे. उपांत्य फेरीत पॅव्हलिउचेन्कोवाने जर्मनीची स्टार महिला खेळाडू अँजेलिक कर्बरचा ६-३, ६-३ असा पराभव केला.
२०१७ मध्ये पॅव्हलिउचेन्कोवाने ओसाकाला हरवले होते. त्यामुळे घरच्या मैदानावर ओसाका ही परतफेड करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ओसाकाने बदलला आपला प्रशिक्षक -
जपानची आघाडीची महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाने आपला टेनिस प्रशिक्षक बदलला आहे. प्रशिक्षक जेरेमाईन जेनकिन्स यांची ओसाकाने साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून तिने वर्षात दोनवेळा आपला प्रशिक्षक बदलला आहे.
३४ वर्षीय जेनकिन्स हे अमेरिका टेनिस संघाच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. शिवाय, ते दिग्गज महिला खेळाडू व्हिनस विल्यम्स हिच्यासोबत सामने खेळले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या अमेरिका ओपन स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेंकिककडून ओसाकाला पराभव स्वीकारावा लागला होता.