स्पेन (माद्रीद) -जागतिक नंबर 1 टेनिस खेळाडू असलेला सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने मंगळवारी माद्रीद ओपन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. तसेच या स्पर्धेत महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली जपानची महिला टेनिस खेळाडू नाओमी ओसाकानेही दुसऱ्या फेरीत विजय मिळवला आहे.
नोव्हाक जोकोव्हिच आणि नाओमी ओसाका माद्रीद ओपनच्या तिसऱ्या फेरीत दाखल - ATP
नोव्हाक आणि नाओमी या दोन्ही अग्रमानांकित खेळाडूंना माद्रीद ओपनच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे

नोव्हाक जोकोव्हिच
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीच जोकोव्हिचने अमेरिकेच्या टेलर फ्रीट्ज 6-4, 6-2 असे पराभूत केले. तर नाओमीने स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्मोला 7-6(5), 3-6, 6-0 ने महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली.
नोव्हाक आणि नाओमी या दोन्ही अग्रमानांकित खेळाडूंना माद्रीद ओपनच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.