मेलबर्न - स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल आणि रुसचा डेनियल मेदवेदेव यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. तर स्पेनचा रोबटरे बतिस्ता अगुत याला पराभवाचा धक्का बसला.
नदालने पहिल्या फेरीत स्पेनच्याच लासलो जेरे याचा १ तास ५२ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ६-३, ६-४, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
मेदवेदेवने कॅनडाच्या वासेक पोसपिसिल याचा १ तास ४७ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ६-२, ६-२, ६-४ ने पराभव केला.
जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानी असलेल्या अगुत पहिल्या फेरीतील पराभवासह ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अगुत याचा ८५ व्या स्थानावर असलेल्या मोलदोवाचा खेळाडू राडु एलबोटने पराभव केला. तीन तास ५ मिनिटे रंगलेल्या सामन्यात अगुतचा ७-६, ०-६, ४-६, ६-७ ने पराभव झाला.