बर्लिन - मोंटे कार्लो मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत उलटफेर पाहायला मिळाला. स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल याला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. रूसच्या रुबलेव आंद्रेव याने नदालचा ६-२, ४-६, ६-२ असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
राफेल नदाल मोंटे कार्लो मास्टर्स स्पर्धेचा तब्बल ११ वेळा विजेता आहे. त्याचा या स्पर्धेतील रेकॉर्ड ७५-५ असा होता. पण यंदा त्याचा उपांत्यपूर्व फेरीत दोन तास ३३ मिनिटे रंगलेल्या सामन्यात पराभव झाला.
रुबलेव याची उपांत्य फेरीत केसपर रुड याच्याशी गाठ पडणार आहे. रुडने दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या फेबियो पोगनिनी याचा ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.