महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'माझे शरीर आता थकले आहे', टेनिस स्टार मरेने दिली प्रतिक्रिया - andy murray after zhuhai championship

तीन सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम -१६ च्या या सामन्यात मिनाउरने मरेला ४-६, ६-२, ६-४ असे हरवले. दुखापतग्रस्त मरेने या स्पर्धेत पुनरागमन केले होते. उत्तम सुरुवात करत त्याने पहिला सेट जिंकला. मात्र, अंतिम दोन सेटमध्ये त्याला पराभव स्विकारावा लागला.

'माझे शरीर आता थकले आहे', टेनिस स्टार मरेने दिली प्रतिक्रिया

By

Published : Sep 27, 2019, 1:20 PM IST

नवी दिल्ली -झुहाई टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनचा स्टार टेनिसपटू अँडी मरेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'माझे शरीर आता थकले आहे', असे मरे सामन्यानंतर म्हणाला. एलेक्स डी मिनाउरने मरेला या स्पर्धेतून बाहेर काढले होते.

तीन सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम -१६ च्या या सामन्यात मिनाउरने मरेला ४-६, ६-२, ६-४ असे हरवले. दुखापतग्रस्त मरेने या स्पर्धेत पुनरागमन केले होते. उत्तम सुरुवात करत त्याने पहिला सेट जिंकला. मात्र, अंतिम दोन सेटमध्ये त्याला पराभव स्विकारावा लागला.

एका मीडियासंस्थेला मरेने माहिती दिली. तो म्हणाला, 'मला शारिरीक त्रास होत होता. माझा खेळ थोडा मंदावला ज्याचा फायदा समोरच्या खेळाडूला झाला. मी खुप थकलो होतो. मी जास्त वेळ टिकू शकलो नाही. मी एक किंवा दोन चांगले गुण मिळवले.'

मरे पुढे म्हणाला, 'मला सामना लगेच संपवायचा होता. मात्र अशावेळी तुम्ही खुप थकता आणि तुमचे फटकेही चुकतात.' उपांत्यपूर्व फेरीत मिनाउरचा सामना क्रोएशियाच्या ब्रोना बोरिकशी होणार आहे. बोरिकने अंतिम- १६ मध्ये चीनच्या के वू डीला ६-३,६-३ ने हरवले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details