महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नदाल, फेडररची ATP Rankings मध्ये घसरण - रॉजर फेडरर

स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा अनुभवी खेळाडू रॉजर फेडरर यांची एटीपी रँकिंगमध्ये घसरण झाली आहे.

medvedev-pushes-nadal-to-no-3-in-atp-rankings
नदाल, फेडररची ATP Rankings मध्ये घसरण

By

Published : May 11, 2021, 8:35 PM IST

पॅरिस - स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा अनुभवी खेळाडू रॉजर फेडरर यांची एटीपी रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. नदाल दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी घसरला आहे. नदालला रशियाचा टेनिसपटू डेनियल मेदवेदेवने जोरदार धक्का दिला आहे.

एटीपी रँकिंगमध्ये सर्बियाचा खेळाडू नोव्हाक जोकोव्हिच अव्वलस्थानावर कायम आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर राफेल नदाल होता. मेदवेदेवने नदालला धक्का देत दुसरे स्थान काबीज केले. आता नदाल तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.

चौथ्या स्थानावर डोमिनिक थीम आहे. तर ग्रीसचा स्टेफानोस सितसिपास हा पाचव्या स्थानी आहे. नुकतीच पार पडलेली माद्रिद ओपन स्पर्धा जिंकलेला अलेक्झेंडर ज्वेरेवने सहावे स्थान पटकावले आहे. सातव्या स्थानी आंद्रे रुबलेव्ह आहे. तर स्वित्झरलँडचा खेळाडू रॉजर फेडरर आठव्या स्थानी घसरला आहे.

दरम्यान, माद्रिद ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अलेक्झेंडर ज्वेरेवने नदालला पराभवाचा धक्का दिला होता. नदालला रँकिंगमध्ये आपले दुसरे स्थान पुन्हा काबीज करण्याची संधी आहे. तो ऑगस्ट महिन्यात होणारी इटालियन ओपन स्पर्धा जिंकून दुसरे स्थान पटकावू शकतो. नदाल इटालियन ओपनचा ९ वेळा विजेता आहे.

हेही वाचा -जगातील अव्वल टेनिसपटू अश्ले बार्टीचा पराभव करत आर्यनाने पटकावले माद्रिद ओपनचे विजेतेपद

हेही वाचा -अलेक्झेंडर ज्वेरेवने पटकावले माद्रिद ओपनचे विजेतेपद

ABOUT THE AUTHOR

...view details