रोम - इटालियन इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत गुरुवारी महिला एकेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. डब्ल्यूटीएच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या आणि स्पर्धेच्या विजेतेपदासाठी संभाव्य दावेदार मानल्या जाणाऱ्या रोमानियाच्या सिमोना हालेपला धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले आहे.
इटालियन ओपनमध्ये मोठा उलटफेर, क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सिमोना हालेपचे आव्हान संपुष्टात
जागतिक क्रमवारीत 42व्या स्थानी असलेली चेक गणराज्यची मारकेटा वोंदरूसोवाकडून सिमोनाचा पराभव
Simona Halep
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत 2 तास 12 मिनटे चाललेल्या लढतीत क्रमवारीत 42 व्या स्थानी असलेली चेक गणराज्यची मारकेटा वोंदरूसोवाकडून सिमोनाला 6-2, 5-7, 3-6 ने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे सिमोनाचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.
वोंदरूसोवाने यापूर्वी झालेल्या इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतही सिमोनाचा पराभव केला होता. वोंदरूसोवाचा पुढील सामना हा रशियाच्या दारिया कसात्किनाशी होणार आहे.