नवी दिल्ली - युएस ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत राफेल नदालकडून पराभव झाल्यानंतर रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने जी खिळाडूवृत्ती आणि प्रगल्भता दाखवली, ती माझ्या मनाला भावली, असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमात मोदीनीं मेदवेदेवचे कौतुक केले.
हेही वाचा ःVIDEO: नोव्हान जोकोव्हीच २५० किलो सुमो पैलवानशी पंगा घेतो, तेव्हा..
नुकत्याच पार पडलेल्या युएस ओपन २०१९ स्पर्धेतील अंतिम सामन्यात राफेल नदालने, डॅनिलचा ७-५, ६-३, ५-७, ४-६, ६-४ असा पराभव केला. या सामन्यानंतर नदालच्या विजयाची जेवढी चर्चा झाली. तेवढीच चर्चा डॅनिलच्या पराभवाची झाली. सामना संपल्यानंतर मेदवेदेवने खिलाडूवृत्ती दाखवत पराभव मान्य केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ पाहून पंतप्रधान मोदींनी आपले मत व्यक्त केले. युएस ओपन स्पर्धा जरी नदालने जिंकली तरी मेदवेदेवने आदर्श वागणुकीने जगभरातील क्रीडाप्रेमींची मने जिंकली असल्याचे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी मेदवेदेवसारखी खिलाडूवृत्ती प्रत्येक भारतीयांनी ठेवावी, अशी आपेक्षा व्यक्त केली.
हेही वाचा ःउसेन बोल्टचा रेकॉर्ड १० महिन्यांपूर्वी आई बनलेल्या एलिसन फेलिक्सने मोडला