मॅड्रिड - 'लाल मातीचा बादशहा' अशी ख्याती असलेला स्पेनचा दिग्गज राफेल नदालला माद्रिद ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला.
१३ वेळेचा चॅम्पियन नदालला सहावा मानांकित अलेक्झांडर ज्वेरेव याने ६-४, ६-४ असे सरळ सेट्समध्ये नमविले. दरम्यान, ही स्पर्धा फ्रेंच ओपन टेनिसच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण स्पर्धा मानली जाते.