मेलबर्न -भारताचा स्टार टेनिसपटू लिअँडर पेसने लॅटव्हियाच्या येलेना ओस्टापेन्कोसह ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयासह सुरुवात केली. त्यांनी मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत स्टॉर्म सँडर्स आणि मार्टा पोलमन्स या जोडीला पराभूत केले. ऑस्ट्रेलियाच्या सँडर्स आणि पोलमन यांच्या जोडीला वाइल्डकार्ड प्रवेश मिळाला होता. १ तास २७ मिनिटे चाललेल्या या सामन्यात पेस-ओस्टापेन्कोच्या त्यांना ६-७ (४) ६-३, १०-६ असे पराभूत करत दुसऱया फेरीत प्रवेश केला.
हेही वाचा -दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटसह त्याच्या मुलीचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू