नवी दिल्ली -टेनिसपटू लिएंडर पेसने जागतिक टेनिसमध्ये भारताला मोठं यश मिळवून दिलं. त्याच्या योगदानामुळे अनेक युवा खेळाडू टेनिसकडे प्रेरित झाले. मात्र, पेसबाबत जो प्रकार गेल्या १९ वर्षात झाला नाही तो यंदाच्या वर्षात झाला आहे.
१९ वर्षानंतर टेनिसपटू लिएंडर पेसबाबत घडला असा प्रकार... - लिएंडर पेस लेटेस्ट न्यूज
भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्यांदा अव्वल-१०० खेळांडूंमधून बाहेर पडला आहे. १९ वर्षानंतर पेसची क्रमवारीत अशी घसरण झाली आहे. पेसच्या क्रमवारीत ५ स्थानांची घसरण झाली असून नव्या क्रमवारीनुसार तो १०१ व्या स्थानावर आहे.

यापूर्वी २००० मध्ये पेस अव्वल-१०० खेळांडूंमधून बाहेर पडला होता. तेव्हा तो ११८ व्या स्थानावर होता. पेस ऑगस्ट २०१४ मध्ये अव्वल-१० मधून बाहेर पडला होता. पेसने आतापर्यंत १८ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये यूएस ओपनमध्ये खेळल्यानंतर तो परत मैदानात उतरला नाही.