न्यूयॉर्क -बिगर मानांकित लॉरा सिग्मंड आणि वेरा ज्वोनरेवा यांनी यंदाच्या यूएस ओपन महिला दुहेरीचे जेतेपदावर नाव कोरले. या जोडीने चीनची जोडी जू यिफान आणि निकोल मेलिचर यांना ६-४, ६-४ असे सरळ सेटमध्ये हरवले. हा सामना ७९ मिनिटे रंगला होता.
यूएस ओपन : सिग्मंड आणि ज्वोनरेवाला महिला दुहेरीचे जेतेपद - vera zvonareva latest news
लॉरा सिग्मंडचे हे महिला दुहेरीमध्ये आजपर्यंतचे मोठे विजेतेपद आहे. तिने वेरा ज्वोनरेवाला सोबत घेत चीनची जोडी जू यिफान आणि निकोल मेलिचर यांना ६-४, ६-४ असे सरळ सेटमध्ये हरवले.
![यूएस ओपन : सिग्मंड आणि ज्वोनरेवाला महिला दुहेरीचे जेतेपद laura siegemund and vera zvonareva win us open women's doubles title](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8777795-thumbnail-3x2-ffgf.jpg)
हा सामना आर्थर एश स्टेडियमवर शुक्रवारी खेळवण्यात आला. लॉरा सिग्मंडचे हे महिला दुहेरीमध्ये आजपर्यंतचे मोठे विजेतेपद आहे. २०१६मध्ये तिने मॅट पाविचला सोबत घेत फ्लशिंग मीडोज येथे मिश्र दुहेरीत अमेरिका ओपनचे जेतेपद जिंकले होते.
या विजेतेपदानंतर ज्वोनरेवा म्हणाली, "हे दोन आठवडे माझ्यासाठी खूप विशेष राहिले. कारण मी बराच काळ दौर्यामुळे बाहेर होती. मी सातत्याने सामने खेळले नाहीत. मला वाटते, की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी लॉरासोबत आहे. तिच्याबरोबर कोर्टवर मी खूप वेळ घालवत होती. ती चांगली जोडीदार आहे.''