महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियन ओपन : क्रिस्टिना-टिमियाने पटकावले महिला दुहेरीचे जेतेपद - टिमिया बाबोस लेटेस्ट न्यूज

क्रिस्टीना-टिमिया जोडीने चिनी तायपेईच्या सु-वे शी आणि झेक प्रजासत्ताकाच्या बार्बोरा स्ट्रीकोव्हाचा पराभव केला. या जोडीने तीन ग्रँड स्लॅम व्यतिरिक्त १० इतर किताबही जिंकले आहेत.

Kristina Mladenovic and Timea Babos win australian open womens doubles 2020
ऑस्ट्रेलियन ओपन : क्रिस्टिना-टिमियाने पटकावले महिला दुहेरीचे जेतेपद

By

Published : Jan 31, 2020, 5:49 PM IST

मेलबर्न - फ्रान्सच्या क्रिस्टिना मालाडेनोव्हिक आणि हंगेरीच्या टिमिया बाबोस या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. त्यांनी शुक्रवारी चिनी तायपेईच्या सु-वे शी आणि झेक प्रजासत्ताकाच्या बार्बोरा स्ट्रीकोव्हाचा ६-२, ६-१ असा पराभव केला. हा सामना १ तास १२ मिनिटे रंगला होता. या जोडीने यापूर्वी २०१८ मध्ये जेतेपद जिंकले होते.

हेही वाचा -सुमारे १४ फूट उंचीवर हवेत उडी मारतो हा मुलगा!..पाहा व्हिडिओ

क्रिस्टीना-टिमिया जोडीने तीन ग्रँड स्लॅम व्यतिरिक्त १० इतर किताबही जिंकले आहेत. गेल्या वर्षी विम्बल्डन उपांत्य फेरीत शिया आणि स्ट्रीकोव्हाच्या जोडीने क्रिस्टीना-टिमियाचा पराभव केला होता.

ज्यूनियर गटात इला-नुग्रोहोला विजेतेपद -

ज्यूनियर गटातील मुलींच्या दुहेरीत चौथी मानांकित फिलीपिन्सच्या अलेक्झांड्रा आयला आणि इंडोनेशियाच्या पॅरिसका मॅडेलिन नुगेरो हिने विजेतेपद जिंकले. या जोडीने अंतिम सामन्यात स्लोव्हेनियाच्या जीवा फाल्कनर आणि इंग्लंडच्या मेटिल्दा मुतावदिचचा ६-१, ६-१ असा पराभव केला.

ABOUT THE AUTHOR

...view details