न्यूयॉर्क -माजी अव्वल आणि चार वेळा ग्रँड स्लॅम विजेती महिला टेनिसपटू किम क्लाइस्टर्सने वेस्टर्न आणि साउदर्न ओपन टेनिस स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. किम म्हणाली, "वेस्टर्न अँड साउदर्न ओपन स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. माझ्याकडे सिनसिनाटी ओपनमध्ये खेळण्याच्या खूप आठवणी आहेत. यावर्षी मी या स्पर्धेत भाग घेण्यास तयार होते. पण वैद्यकीय सल्ला मिळाल्यानंतर मला परतण्यासाठी आणखी थोडा वेळ हवा आहे."
किमला या स्पर्धेसाठी वाईल्ड कार्ड मिळाले आहे. पहिल्या फेरीत ३७ वर्षीय किमचा सामना जेनिफर ब्रॅडीशी होणार होता. यापूर्वी स्पेनच्या गार्बिन मुगुरुझानेही दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली होती.