महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टेनिस : कॅरोलिना प्लिस्कोवाने पटकावले झेंगझू ओपनचे जेतेपद

अव्वल सीडेड प्लिस्कोवाने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सातव्या सीडेड पेट्रा मार्टिकला हरवले. प्लिस्कोवाने क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिकचा ७७ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-३, ६-२ असा पराभव केला. २६ वर्षीय प्लिस्कोवाचे कारकिर्दीतील हे १५ वे जेतेपद आहे. तिने या वर्षी ब्रिस्बेन, रोम आणि ईस्टबर्न या स्पर्धेची जेतेपदे जिंकली आहेत.

टेनिस : कॅरोलिना प्लिस्कोवाने पटकावले झेंगझू ओपनचे जेतेपद

By

Published : Sep 16, 2019, 7:46 AM IST

नवी दिल्ली -टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कॅरोलिना प्लिस्कोवाने झेंगझू ओपनचे जेतेपद पटकावले आहे. चेक गणराज्यच्या प्लिस्कोवाचे हे यंदाचे चौथे जेतेपद आहे.

हेही वाचा -इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर १३५ धावांनी विजय, अॅशेस मालिका २-२ ने बरोबरीत

अव्वल सीडेड प्लिस्कोवाने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सातव्या सीडेड पेट्रा मार्टिकला हरवले. प्लिस्कोवाने क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिकचा ७७ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-३, ६-२ असा पराभव केला. २६ वर्षीय प्लिस्कोवाचे कारकिर्दीतील हे १५ वे जेतेपद आहे. तिने या वर्षी ब्रिस्बेन, रोम आणि ईस्टबर्न या स्पर्धेची जेतेपदे जिंकली आहेत.

हेही वाचा -टी-२० विश्वकरंडकपूर्वी विराटचा खेळाडूंना इशारा, ५ सामन्यात स्वतःला सिध्द करा अन्यथा...

मार्टिकने याआधी प्लिस्कोवाला ४ वेळा हरवले आहे. तर, प्लिस्कोवाला एकदा विजय मिळवता आला आहे. या वर्षीच्या प्रारंभी रोलां गॅरोमध्ये मार्टिकने प्लिस्कोवाला हरवले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details