टोकियो (जपान) - जागतिक टेनिस पुरुष क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या नोव्हान जोकोव्हिचने पहिल्यांदाच जपान ओपन स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा जपानची राजधानी टोकियो येथे खेळवण्यात आली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियाचा जॉन मिलमनचा पराभव केला. दरम्यान, जोकोव्हिचचे हे कारकीर्दीतील ७६ वे विजेतेपद ठरले आहे.
आज रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात जोकोव्हिचने जॉनचा ६-३, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. जोकोव्हिचने या सामन्यात एकही सेट न गमावता अवघ्या ६९ मिनिटात विजयावर मोहोर लावली.