मेलबर्न - इवॉन डेडिंग आणि फिलीप पोलासेक या जोडीने गतविजेत्या जो सॅलिसबरी आणि राजीव राम या जोडीचा पराभव करत ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
नवव्या मानांकित जोडी पाचव्या मानांकित जोडीवर वरचढ ठरली. अंतिम सामना डोडिंग आणि पोलासेक जोडीने ६-३, ६-४ अशा फरकाने जिंकत पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली.
विजयानंतर डोडिंगने सांगितले की, अविश्वरणीय आठवण. 'हे आमचे संघ म्हणून पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. या सामन्यात आम्ही भरपूर आनंद घेतला. आशा आहे की, पुढे देखील ही कामगिरी कायम राहिल.'