मोनॅको -इटलीच्या 31 वर्षीय फॅबिओ फॉगनिनीने रविवारी सर्बियाच्या दुसॅन लॅजोव्हिकला 6-3, 6-4 ने पराभुत करत मॉन्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेचा किताब पटकावला. फोगनिनीचे हे पहिलेच एटीपी मास्टर्स स्पर्धेतील विजेतेपद ठरले आहे.
एटीपीच्या जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानी असलेल्या फोगनिनीवे उपांत्य फेरीत जागतिक क्रमावारीत अव्वल असलेल्या राफेल नादालला 6-4, 6-2 असा पराभवाचा धक्का देत मोठा उलटफेर केला होता.
फोगनिनी 1977 नंतर मॉन्टे कार्लो मास्टर्सचा किताब जिंकणारा इटलीचा पहिला खेळाडू बनला आहे. त्याच्यापूर्वी कोराडो बाराजुटीने याने स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
या स्पर्धेत नोव्हाक जोकोविचचा तिसऱ्या फेरीत धक्कादायक पराभव झाला होता. एटीपीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेला सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला होता. त्याला रशियाच्या डेनिल मेदवेदेव्हकडून 6-3, 4-6, 6-2 असे पराभुत व्हावे लागले होते.