सिंगापूर - भारताचा पुरूष टेनिसपटू रामकुमार रामनाथन याला सिंगापूर ओपनच्या पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावला लागला. अमेरिकेच्या टारो डेनियलने रामनाथन याचा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला.
डेनियलने जागतिक क्रमवारीत २००व्या स्थानी असलेल्या रामनाथनचा दोन तास सहा मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-३, ७-६, ६-३ अशा फरकाने पराभव केला.
पहिला सेट ६-३ ने गमावल्यानंतर रामनाथनने दुसऱ्या सेटमध्ये डेनियलला कडवी झुंज दिली. हा सेट ट्रायब्रेकरमध्ये गेल्यानंतर यात डेनियलने बाजी मारली.
रामनाथन याचा डेनियलविरुद्धचा हा दुसरा पराभव आहे. याआधी २०१२ च्या आयटीएफ फ्युचर्स स्पर्धेत डेनियलने रामनाथनचा पराभव केला होता.