मेलबर्न -भारतीय टेनिसपटू दिविज शरणला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरूष दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस आणि क्रोएशियाच्या मेट पेविक यांनी न्यूझीलंडच्या एर्टेम सिताकसोबत खेळलेल्या शरणला दुसऱया फेरीत ७-६ (६-२), ६-३ अशी मात दिली. हा सामना एक तास १७ मिनिटे रंगला होता.
हेही वाचा -VIDEO : ...आणि अनिताची नदालने केली विचारपूस!
पातालो कॅरेनो बुस्टा आणि जोओ सुसाचा पराभव करून सिताक आणि शरण यांनी दुसर्या फेरीत प्रवेश केला होता. तत्पूर्वी, पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या रोहन बोपन्नाला पराभव स्वीकारावा लागला आहे.
तर, दुसरीकडे प्रजनेश गुणेश्वरनच्या पराभवाने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतील भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. पहिल्या फेरीसाठी झालेल्या सामन्यात जपानच्या ततसुमा इटो याने गुणेश्वरनचा पराभव केला.