हिरोशिमा- भारतीय महिला हॉकी संघाने जपानमध्ये झालेल्या एफआईएच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान जपानचा ३-१ ने पराभव केला. या सामन्यात भारतीय महिला संघाने नियोजनबध्द खेळ केला. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी 'एफआईएच वुमेंन्स सीरीज फाईनल्स'च्या उपांत्य सामन्यात चिलीचा ४-२ ने पराभव करुन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या विजयाने भारतीय संघ एफआईएच ऑलिम्पिक २०१९ स्पर्धेच्या 'पात्रता' फेरीत दाखल झाला आहे.
चक दे इंडिया ! जपानचा 'फडशा' पाडत महिला संघाने जिंकली एफआईएच स्पर्धा; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन - FIH Series
भारतीय महिला हॉकी संघाने जपानमध्ये होत असलेल्या एफआईएच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान जपानचा ३-१ ने पराभव केला. महिला संघाने नियोजनबध्द खेळ करत सामन्यात वर्चस्व निर्माण केले होते.
![चक दे इंडिया ! जपानचा 'फडशा' पाडत महिला संघाने जिंकली एफआईएच स्पर्धा; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3641295-698-3641295-1561288626575.jpg)
आशियाई खेळांचे विजेतेपद मिळवलेल्या जपानची कडवी झुंज मोडून काढण्यात भारतीय महिला संघाला यश आले. सामन्यात कर्णधार राणी रामपाल हिने तिसऱ्या मिनिटांला पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जपानच्या कानोन मोरीने ११ मिनिटाला गोल करत सामन्यात बरोबरी केली. त्यानंतर भारताकडून गुरजित कौरने ४५ व्या आणि ६० व्या मिनिटाला गोल करत भारताला विजय मिळवून दिला.
भारतीय महिला संघाच्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले आहे.