मुंबई - अंतिम सामन्यात पहिले दोन सेट गमावल्यानंतर सार्बियाचा अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोव्हिचने आपला अनुभव पणाला लावत पुढील तीन सेट जिंकत फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याच्या या झुंजार खेळीचे कौतूक भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांनी केलं आहे.
सचिन आणि लक्ष्मण यांनी फ्रेंच ओपनचा अंतिम सामना संपल्यानंतर आपापल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले आहेत. यात सचिनने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'अप्रतिम अंतिम सामना. अवघड सामन्यानंतरही जोकोव्हिचने उत्कृष्ट पुनरागमन केले. तो खेळाच्या दृष्टिकोनातून, तसेच शारिरिक दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कणखर होता. या गोष्टीमुळेच तो अंतिम सामना जिंकू शकला.'
पुढे सचिनने त्सीत्सीपासचे कौतूक करताना म्हटलं की, त्सीत्सीपासनेही उत्तम खेळ केला. भविष्यात तो बऱ्याच ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकेल याची खात्री आहे.