पॅरिस - यंदाची फ्रेंच ओपन स्पर्धा प्रेक्षकांशिवाय आयोजित होऊ शकेल, असे फ्रान्स टेनिस महासंघाचे अध्यक्ष (एफएफटी) बर्नार्ड गुइडिसेली यांचे म्हणणे आहे. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या स्पर्धेची स्थगिती प्रथम मार्चमध्ये जाहीर केली गेली होती. त्यानंतर, फ्रान्समध्ये लॉकडाऊन सुरू झाले.
गुईडसेली यांनी सांगितले, “आम्ही कोणताही पर्याय नाकारला नाही. जगभरातील कोट्यावधी लोक या स्पर्धेची प्रतीक्षा करत आहेत. रिकाम्या स्टेडियममध्ये ही स्पर्धा घेऊन, व्यावसायिक मॉडेलचा एक भाग- टीव्ही हक्क (स्पर्धेच्या उत्पन्नाच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त भाग) चालूच राहील. याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही."