बर्लिन - महिला विम्बल्डन खेळाडू ज्युलिया जॉर्जेसने वयाच्या ३१व्या वर्षी टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. जर्मनीच्या ज्युलियाने २०१८मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम नववे स्थान गाठले होते. ती सध्या ४५व्या क्रमांकावर आहे. फ्रेंच ओपनमध्ये तिने लॉरा सिग्मंड विरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. या सामन्यात ज्युलियाला पराभव पत्करावा लागला.
विम्बल्डनमध्ये खेळलेल्या खेळाडूची टेनिसमधून निवृत्ती - julia goerges tennis news
टेनिस खेळाला संबोधित केलेल्या पत्रात जॉर्जसने असे लिहिले आहे, की ती १५ वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीनंतर निरोप घेण्यासाठी सज्ज आहे. ''मी माझ्या जीवनाचा टेनिस अध्याय बंद करण्यास आणि नवीन जीवन सुरू करण्यास तयार आहे", असे तिने या पत्रात म्हटले.
![विम्बल्डनमध्ये खेळलेल्या खेळाडूची टेनिसमधून निवृत्ती Former wimbledon semifinalist julia goerges retires at 31](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9297930-thumbnail-3x2-dfdfdf.jpg)
टेनिस खेळाला संबोधित केलेल्या पत्रात जॉर्जसने असे लिहिले आहे, की ती १५ वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीनंतर निरोप घेण्यासाठी सज्ज आहे. ''मी माझ्या जीवनाचा टेनिस अध्याय बंद करण्यास आणि नवीन जीवन सुरू करण्यास तयार आहे", असे तिने या पत्रात म्हटले.
विम्बल्डन २०१८च्या उपांत्य सामन्यात तिला सेरेना विल्यम्सकडून सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. २०१४च्या फ्रेंच ओपनमध्ये ती नेनाड झिमोनिकसोबत मिश्र दुहेरीत उपविजेती ठरली होती. २०१४मध्ये जर्मनीमधील फेड कपच्या अंतिम फेरीतही तिने प्रवेश केला होता. ज्युलिया २०११ मध्ये स्टुटगार्ट आणि २०१७मध्ये मॉस्को आणि डब्ल्यूटीए एलिट ट्रॉफीमध्ये विजेती ठरली आहे.